Dr. Mukund Naikडॉक्टर मुकुंद विनायक नाईक (MBBS, FIAA, FCIP) यांनी पुण्यात वीस वर्षे जनरल प्रॅक्टिस केलेली आहे. गुरुजी ऋषी प्रभाकरजी स्थापित ऋषी संस्कृती विद्या केंद्र बंगलोर या सामाजिक संस्थेमध्ये 1994 पासून सहभाग आहे. सन 1999 ला सिद्ध समाधी योग शिबिद्वारे प्राणायाम, मेडिटेशन, योग, आहार, आनंदी जीवनासाठी डिझाईन केलेल्या पंधरा दिवसाच्या कार्यक्रमाच्या पूर्णवेळ प्रसार व प्रचारासाठी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे त्यांनी स्थलांतर केले.एस एस वाय शिबिरच्या माध्यमातून तयार केलेल्या 30 शिक्षकांच्या सहाय्याने नगर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अंदाजे एक लाख लोकांच्या जीवनात आनंद फुलवला.अनेकांना रोगमुक्त व व्यसनमुक्त केले आहे. अंध, अपंग, अनाथ, एड्सग्रस्त अशा अनेक संस्थांना त्यांनी सपोर्ट केला आहे. सुमारे 100 डॉक्टर्सना एथिकल प्रॅक्टिस साठी त्यांनी प्रेरणा दिली आहे. सन 2001 ला लोणी जिल्हा अहमदनगर येथे त्यांनी स्थलांतर केले. अनेक कॉलेजमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम घेऊन मुलांमध्ये बदल व प्रगती घडून आणली आहे. सन 2004 मध्ये संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे त्यांनी स्थलांतर केले. त्यांना मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश भाषा अवगत आहेत. तीस कुटुंबांना मुले दत्तक घेण्यास त्यांनी प्रेरणा दिली व त्यांना सहकार्य केले. हजारो लोकांना योगासन व प्राणायाम त्यांनी शिकवले आहे. 2006 ते 2012 पर्यंत अंदाजे 50 क्रॉनिक पेशंटच्या घरी जाऊन त्यांनी सेवा दिली आहे. 2008 ते 2012 संगमनेर वृद्धाश्रमात त्यांनी सेवा दिलेली आहे. आठ ते चौदा वयोगटातील लहान मुलांचे सुमारे 100 पेक्षा जास्त संस्कार वर्ग त्यांनी घेतलेले आहेत. शेकडो कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांनी वाचनाची आवड लावली आहे. शेकडो विद्यार्थ्यांना ट्रेकिंग द्वारे निसर्ग प्रेम व स्वच्छता अभियान द्वारा पर्यावरण रक्षणाचे धडे ही त्यांनी दिलेले आहेत. सामाजिक एकात्मतेसाठी हजारोंना सोबत घेऊन मंदिर, मज्जित, चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिर येथे त्यांनी प्रार्थना केले आहेत. सर्व जातीच्या आठ ते चौदा वयोगटातल्या मुले व मुलींसाठी उपनयन संस्कार शिबिराचे आयोजनही त्यांनी केले आहे. युवांना महाराष्ट्रभर चालणाऱ्या कृतीवंत मान्यवरांच्या शिबिराला स्वतः ते घेऊन जात आहेत उदाहरणार्थ नगरला स्नेहालय, राणी बंग, अमरावती येथील डॉक्टर अविनाश सावजी इत्यादी शिबिरांपर्यंत त्यांनी मुलांना घेऊन गेले आहेत. गौरव विजय नागरी पतसंस्था द्वारे नगराध्यक्षांच्या हस्ते २००७ मध्ये त्यांचा सत्कार झाला आहे. इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर तर्फे 2014 मध्ये सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.गेली पंधरा वर्षे ग्रामविकासासाठी काम करत आहेत आणि खेड्यांमध्ये व्यसनमुक्ती, पर्यावरण, जलसंधारण, निसर्गप्रेम, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड इत्यादी उपक्रम ते राबवित आहेत. विकास डाके - येठेवाडी (ता. संगमनेर), डॉ. हेमा वैरागर - जोठेवाडी (ता. संगमनेर), भाऊ रोडे – खंदरमाळ( ता. संगमनेर) येथे विकास कामे करत आहे. श्री बाळासाहेब गलांडे यांच्या विकास कामांची नोंद अग्रोवन मासिक व साम टीव्ही ने घेतली आहे. 2018- 19 साठी स्मार्ट ग्राम पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. साम टीव्हीवर 2010 मध्ये 93 शेतकऱ्यांची यशोगाथा या कार्यक्रमात त्यांचा समावेश आहे. श्री दत्ता शिरसाठाने सर्वानुमते बिनविरोध लोकप्रतिनिधींची निवड केली व ग्राम स्वच्छता व वृक्ष लागवड अभियान राबवले. श्री विकास डाके यांनी ओसाड डोंगरावर वीस एकर जागेमध्ये दहा हजार वेगळ्या प्रकारचे झाडे गावकऱ्यांच्या मदतीने लावून आठ वर्षात मोठी करून ती पूर्णपणे जोपासली आहेत. डॉक्टर हेमा वैरागर यांनी जोठेवाडीला 500 झाड एस एस वाय साधकांच्या मदतीने लावली आणि जगवली आहे. भाऊ रोडे वृक्ष मंदिर उपक्रमाद्वारे सत्तर वडांची झाडे लावली व जगवली आहेत पुढील दहा वर्षात 1000 झाडे लावायचा संकल्प त्यांनी केलेला आहे. अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित होणाऱ्या आपले आदर्श गाव या मासिकात मे 2010 प्रसिद्ध, याशिवाय लोकमत जळगाव मार्च 2012, सार्वमत अहमदनगर मे 2010 या दैनिकांमध्येही लेख प्रसिद्ध आहेत. इतरांनी केलेले लेखन - प्रकाश दिनकर गांगल लोकसत्ता 2011, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लोकसत्ता 26 जानेवारी 2012 (सोकूल स्तंभलेख), 2012 मध्ये युवा चेतना शिबिर से आयोजन पाच जिल्ह्यातले 90 युवा 15 दिवस सहभागी झाले होते. युवांना प्रशिक्षण देऊन ग्राम विकासासाठी पाठवून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवणे हेच त्यांचे मिशन आहे.